*मुंबई चेंबूर*
*बोधिवृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आंदोलनकर्त्यां महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार*
प्रतिनिधी:
गेल्या दोन वर्षांपासून बूध्द विहार व घरांच्या न्याय हक्क साठी साखळी उपोषणास बसलेले पंचशिल नगर,अमर महल चेंबूर येथील आंदोलन कर्त्या महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोधिवृक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष आयु राजेंद्र ससाणे यांनी कोणताही लढा, आंदोलनं यशस्वी करायचेच असेल तर महिलांना डावलून चालणार नाही,तर संघटित महिला कोणताही लढा, आंदोलन यशस्वी करू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
बोधिवृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आदोलनकर्त्या महिलांचा साड्या देवून सत्कार करताना SRA विकासकाच्या विरोधात लढा तीव्र करण्याची प्रेरणा देईल ,अशा आंदोलनात बोधिवृक्ष फाऊंडेशनची सहकार्याची भूमिका वटवणार असून विधायक आंदोलनांस मानसिक आर्थिक, सामाजिक पाठबळ प्रदान करण्याचीत तत्पुरता बोधिवृक्ष फाउंडेशन दाखवेल असे विचार बोधिवृक्ष फाऊंडेशनचे सरचिटणीस आयु.प्रताप पाटील... तसेच महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अँड.महादेव ढोणे साहेब,ॲड.संतोष सांजकर प्रमुख सल्लागार.. मुंबई प्रदेश अध्यक्ष मनोज इगवे.. दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष जीवन भोसले , राजेंद्र मोरे, अविनाश निकम यांनी व्यक्त केली.
राजेश पाटील, सुजान्त ससाणे, दिनेश तांबे,अतिशय नितनवरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आयु. सचिन सकटे... अणुशक्ती नगर शाखा अध्यक्ष यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.