महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्यावतीने औसा येथे भीक मागो आंदोलन

 महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्यावतीने औसा येथे भीक मागो आंदोलन






औसा मुख्तार मणियार

दिव्यांगाच्या हक्काचे पांच टक्के राखीव निधी वाटप करण्यात नगरपरिषद असमर्थ असल्यामुळे दिव्यांगाचे भीक मागो आंदोलन दिनांक 5 ऑक्टोंबर 2020 रोजी करण्याचे दिव्यांग मिनाहज शेख औसा यांनी नगरपालिकेला एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे दिव्यांग निधी अधिनियम प्रमाणे आपल्या कार्यलयाला मार्फत एका कार्यक्रमांमध्ये 5000 रुपयाचा अपंग सहायता निधीचा डेमो चेक देण्यात आले होते हे चेक देऊन आज दोन वर्ष पूर्ण होत असून सुद्धा आज घडीला आमच्या खात्यामध्ये फक्त प्रत्यक्षात पंधराशे रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे आम्हा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना असे वाटते की औसा नगरपरिषद दिव्यांग हक निधी देण्यात असमर्थ वाटत आहे त्यामुळे आम्ही दिनांक 5 ऑक्टोंबर 2020 रोजी औसा नगर परिषदेच्या फंडासाठी औसा शहरात भीक मागून जमा झालेले पैसे औसा नगरपरिषदेच्या फंडासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे आंदोलन करण्याचे महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्या वतीने औसा शहराध्यक्ष शेख मीनाहज मुक्तार यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाचे औसा शहराध्यक्ष मिनाहज मुक्तार शेख यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या