भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न कधी सुटणार? बेरोजगार विद्यार्थ्यांचा टाहो, सरकार तुम्ही ऐका हो!




 भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न कधी सुटणार?

बेरोजगार विद्यार्थ्यांचा टाहो,

सरकार तुम्ही ऐका हो!     

औसा (जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)       



  

  औसा-३०सप्टेंबर १९९३ रोजी औसा तालुक्यातील किल्लारी या गावी पहाटे भूकंप झाला. या भूकंपात अनेक कुटुंब उदवस्त झाली.अनेकांची घरे पडली अनेकांची संसार उध्वस्त झाली.राज्य सरकारने भूकंपग्रस्त प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.परंतु ते आज कागदावर असल्याचे दिसते. नोकरीत आरक्षण देऊन भूकंपग्रस्ताना आधार देण्याचे ठरवले. परंतु आज भूकंप होऊन २७ वर्ष पूर्ण झाली तरी भूकंपग्रस्त नागरिकांच्या नोकरीचा प्रश्न सुटला नसल्याचे दिसते .अनेक विद्यार्थ्यांचे वय संपून चालले तरी नोकरीची संधी मिळाली नसल्याचे दिसते. अनेक विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ आली असून अनेक विद्यार्थी बेरोजगार झाल्याचे दिसते. शासनाच्या नोकर भरतीत जागा निघाल्या नंतर कुठेतरी एक  जागा पहायला दिसते. "राज्य सरकारने भूकंपग्रस्तांना तात्काळ  सरळसेवेने नोकरीत संधी उपलब्ध करून देण्यात  यावी.भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांचे  संकलन करण्यात आले असून संकलन  यादी नुसार भूकंपग्रस्ताना नोकरीत संधी मिळावीअशी अपेक्षा अनेक विद्यार्थी करत आहेत.येणाऱ्या मेगा भरतीत सरकारने भुकंपगस्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना  न्याय द्यावाअशी मागणी शेख महंमद आणि औसा तालुका येथील सुशिक्षित बेरोजगार भूकंपग्रस्त  विद्यार्थी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या