नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे स्ट्रीट लाइट उभारणीचे काम सुरू*

 *नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे स्ट्रीट लाइट उभारणीचे काम सुरू*                         







सोलापूर (      ) नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे  कै.सौ.रखमाबाई हत्तुरे मंगल कार्यालय रोड,* वैष्णवी सिटी शेजारी (जुना कुमठा रोड)  या  ठिकाणी  *लाइट सोय नसल्यामुळे* भाजीपाला विक्रते व नागरिकांना,महिलांना प्रचंड त्रास होत होता. याकरिता *जय हो कामगार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष तथा परिवहन समितीचे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे* यांनी मनपा आयुक्त पि. शिवशंकर व लाइट विभागाचे अधिकारी महादेव इंगळे साहेबांनाकडे *जय हो कामगार संघटनेच्या* वतीने विनंती केली होती. याची दखल घेऊन आज भाजीपाला मंडई रोड वर *18 स्ट्रीट लाइट  पोल स्मार्ट सिटी कंपनी च्या फंडातून* उभारण्यात आले आहे. लाइटची सोय झाल्या मुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. *स्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ त्र्यंबक डेंगले पाटीलसाहेब ,मनपा आयुक्त पी. शिवशंकर साहेब, मनपा लाइट विभागाचे महादेव इंगळे साहेब* यांनी लाइट चा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्यामुळे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी आभार मानले आहे.

*सोलापूर रिपोर्टर*

*इद्रिस सिद्दीकी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या