विधेयकाच्या विरोधात मोठ्या स्वरुपात अभियान राबवणार-श्रीशैल्य उटगे

 विधेयकाच्या विरोधात मोठ्या स्वरुपात अभियान राबवणार-श्रीशैल्य उटगे







औसा मुख्तार मणियार

 लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे "किसान विरोधी नरेंद्र मोदी" अशा पद्धतीचे अभियान राबवणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून जाहीर केले आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात लोकसभे बरोबर राज्यसभेत शेतकरी विरोधी कायदा पास केल्यामुळे शेतकरी वर्गाचे भरपूर नुकसान झाले आहे.याचा विरोध म्हणून याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या सहाय्याने व जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी च्या साह्याने हे अभियान राबवले जाणार आहे. या विधेयकामुळे MSP राहणार आहे की नाही हे कळत नाही, विपनना साठी बाजार समित्या राहणार नाही तर कशा पद्धतीने विपणन होणार आहे. याची माहिती नाही. हे विधेयक आणताना कोणत्याही शेतकऱ्यांशी किंवा शेतकरी नेत्याशी ,खासदारांशी चर्चा न करता हे विधेयक पास केले गेले आहे.हे विधेयक कोणालातरी मदत करण्याच्या हेतूने पास करण्यात आले आहे. यामुळे या विधेयकाच्या विरोधात अभियान राबवले जाणार आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. म्हणून या विधेयकाच्या विरोधात पुढील काळात मोठ्या स्वरूपात अभियान राबवले जाणार असल्याचे श्रीशैल्य उटगे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या