सुनील दिगंबर पवार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

 सुनील दिगंबर पवार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती 






औसा मुख्तार मणियार

 ठाणे औराद येथे कार्यरत असणारे श्री सुनील दिगंबर पवार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. सुनिल पवार हे मूळचे बोरफळ तालुका औसा येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बालपण व शिक्षण मदनसुरी तालुका निलंगा येथे झालेले आहे. पोलीस शिपाई म्हणून भरती झाले होते पोलीस नाईक, पोलीस हवालदार ,ते आज सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत मजल मारली आहे, कमी कालावधीमध्ये या पदापर्यंत पोहोचणारे ठरावीक कर्मचाऱ्यांपैकी सुनील पवार हे एक आहेत. सुनील पवार हे अत्यंत प्रामाणिक कर्तबगार कर्तव्यनिष्ठ असून पोलीस खात्यात असून सुद्धा समाजाबरोबर राहणे तक्रार घेऊन आलेल्या लोकांचं समाधान करणे वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे प्रामाणिकपणे आपली ड्युटी करणे हे सुनील पवार  यांना खूप चांगल्या पद्धतीने अवगत झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून आज त्यांच प्रमोशन झालेलआहे .त्यांच्या सर्व मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये हे आनंदाचे वातावरण असून आज मी  माझ्या निवासस्थानी सुनिल पवार तसेच औराद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान सूर्यवंशी साहेब यांचा सत्कार आयोजित केला होता याप्रसंगी माजी सरपंच अशोक जाधव किल्लारी सहकारी  कारखान्याचे माजी संचालक मधुकर राव जाधव गोविंद माने अरविंद माने आकाश शिंदे जीवन माने ग्रामपंचायत सदस्य अशोक सूर्यवंशी दिलीप जाधव वेंकट राजे आबा गायकवाड माधव शिंदे धनाजी माने विलास विहिरे सुरेश चाफेकर गुलाब माने मदनसुरी येथील नागरिक बरेच जण उपस्थित होते मी  माझ्या कुटुंबाच्या वतीने समस्त ग्रामस्थ मदनसुरी कर यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा �

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या