राष्ट्रीय महामार्ग ते सांगवी (काटी) या गावाला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली.
सांगवी (का) ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) : तालुक्यातील सांगवी (का) व पांग रधरवडी या दोन्ही गावांना राष्ट्रीय महामार्गाचा जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असणारा सांगवी मळुंब्रा साठवण तलाव प्रत्येक वर्षी ओव्हरफ्लो होतो त्यामुळे दोन्ही गावातील लोकांना विविध कामासाठी तुळजापूर अथवा सोलापूरला जाण्यासाठी या पुलावरून ये जा करावे लागते. या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत आहे या पाण्यातून लोकांना आपला जीव मुठीत घेऊन हा पूल पार करावा लागत आहे. त्यातच त्या पुलाचे सौरक्षण कठडे तुटल्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. सांगवी गावाच्या पूर्वेस, व पश्चिमेस दोन्ही बाजूला ओढा असून पाणी पुलावरून वाहू लागल्यास सांगवी गावाचा पूर्णपणे,रस्ता, दळणवळण बंद होते. गेली वीस वर्षापासून ही सगळ्यात मोठी समस्या गावासमोर आहे. या पुलासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता प्रशासन स्तरावरून सांगण्यात येते की हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये मंजूर असून या पुलासाठी निधीअभावी कामकाज ठप्प आहे. असे सांगण्यात येते.
*दत्ता शिंदे यांनी केली या पुलाची पाहणी*
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणाचे सदस्य दत्ता शिंदे यांनी या पुलाची पाहणी करून या रस्त्यासाठी शशन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.