माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आशा कार्यकर्तीनी घरोघर केली आरोग्य तपासणी*.

 *माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आशा कार्यकर्तीनी घरोघर केली आरोग्य तपासणी*. 





लातुर: दि. २६ - हरंगुळ बु. येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत मंदार विभागात  दिनांक २६ सप्टेंबर रोजी आशा कार्यकर्ती ने घरोघर जाऊन आरोग्याची तपासणी केली.  

हरंगुळ (बु) चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांच्या घरी मंदार येथे आज आरोग्य तपासणीसाठी रेश्मा शंकर माळगे, सुनिता सूर्यकांत मुगावे, बालिका कैलास कांबळे या तिन आशा कार्यकर्ती येऊन पनाळे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी आशा कार्यकर्त्यींचे त्यांच्या कामाबद्दल पनाळे कुटुंबियाकडून कौतुक करण्यात आले. कोरोना महामारी निर्माण झाल्यापासून प्रत्येक जण भीतीदायक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीमध्ये गावातील सर्वच आशा कार्यकर्तीने व आरोग्यसेविका मनीषा शिवाजी शिंदे यांनी मृत्यूची भीती न बाळगता संपूर्ण गावात आरोग्य सेवा करण्याचे काम केलेले आहे. त्याबद्दल सर्व आशा कार्यकर्तीना व आरोग्य सेविकेस माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी धन्यवाद देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. 

हरंगुळ (बु) गावची लोकसंख्या ९१९७ असून १६२५ एकूण घरे आहेत. हरंगुळ (बु) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मनीषा शिवाजी शिंदे या एकमेव आरोग्यसेविका आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत हरंगुळ चे तीन भाग करुन आरोग्य तपासणीसाठी तिन पथकाची निर्मिती व प्रत्येक पथकामध्ये तीन कार्यकर्ती आहेत.  

हरंगुळ (बु) जुने गावभाग, सबस्टेशन येथील ७५८ घरात ४०४९ लोकांची आरोग्य तपासणी सुप्रिया संतोष कांबळे, मीरा संजय खांडेकर, शीला भीमाशंकर पांढरे यांचे पथक करणार आहे. 

विकासनगर, गोविंदनगर, सदाशिवनगर या भागात २७८ घरी २०८० लोकांना आरोग्य सेविका मनीषा शिवाजी शिंदे व सोबत सुनंदा परमेश्वर गायकवाड आशा कार्यकर्ती, सुरेखा मलिकार्जुन लांडगे अंगणवाडी कार्यकर्ती या तिघींचे पथक तपासणार आहे.  

तर मंदार, समर्थनगर रेल्वे स्टेशन, माऊलीनगर, वसवाडी या भागात  ५८९ घरामधील ३०६८ नागरिकांची रेश्मा शंकर माळगे सुनिता सूर्यकांत मुगावे, बालिका कैलास कांबळे या तीन अशा कार्यकर्ती आरोग्य तपासणीचे काम करत आहेत. 

या तीनही पथकाच्या माध्यमातून कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी मास्क, सँनिटायझर वापरा, भाजीपाल्यांचा धूवुन वापर करा, अशा महत्वपूर्ण सूचना करून नागरिकांचे प्रबोधन करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 


*- व्यंकटराव पनाळे, मुक्तपत्रकार*.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या