शासनाने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत करावी :अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीपूर्वी मदत करावी अशी मागणी महाविकासआघाडी द्वारा आयोजित पत्रकार परिषद अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले की निलंगा विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे सरसकट करून दिवाळीपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी व अनेक शेतकऱ्यांचे जनावरे पुरामुळे वाहून गेले आहेत त्यांना पण शासनाने मदत करावी अतिवृष्टीमुळे ऊस भाजीपाला फळबाग फुल शेती यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्यांचा आहे त्यात समावेश करावा तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शेतात पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतावर उभी असून त्या जागेवर मोड फुटल्यामुळे ते आता काढणीयोग्य राहिले नाही त्याही शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशा अनेक शेतकरी या पुरामुळे अडचणीत सापडले आहेत त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करावी राज्य शासनाने हेक्टरी 25,000 केंद्र सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली त्याचबरोबर विमा कंपनीला दिलेल्या जाचक अटी व शर्ती बाजूला ठेवून महसूल विभागाने केलेल्या पंचनामे नुसार विमा वाटप करावा तसेच शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी दिली परंतु चालू थकबाकी शेतकऱ्यांना आपल्या या योजनेचा लाभ मिळाला नाही तरी लातूर जिल्ह्यातील या लाभापासून वंचित असलेल्या चालू बाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी त्यांनी मागणी केली. या प्रसंगी या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके, शिवसेनाचे नेते लिंबन महाराज रेशमे, विनोद आर्य, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, हसन चाऊस, माजी जि. प. अध्यक्ष पंडित धुमाळ, शेकापचे नारायण सोमवंशी, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, प्रभाकर बंडगर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, अजगर अन्सारी, लाला पटेल, शिराज देशमुख, अनिल अग्रवाल, सुधाकर पाटील, सुरेंद्र धुमाळ, दयानंद चोपणे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.