पगारासाठी अमरण उपोषणास बसलेल्या गुरुजनांचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या मध्यस्थीने सुटला.
लातुर : दि. २०- संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबुलगा (बु) ता. निलंगा संचलित "महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय" निलंगा येथील गुरुजनांचे लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पगारासाठी दि. १९ ऑक्टोंबर रोजी सुरु झालेले अमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते तथा लोकाधिकार न्यूजचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्या मध्यस्थीने अमरण उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकांच्या पगाराबाबतच्या सेवापुस्तिका मुळे निर्माण झालेला प्रश्न मिटवून सदरील अमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
पत्रकार अरविंद पत्की यांनी लातूर येथे जिल्हा परिषदेसमोर निलंगा येथील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक अमरण उपोषणाला बसले बाबतची माहिती लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांना सांगून आपण शिक्षकांच्या या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार व्यंकटराव पनाळे यांनी अमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपोषण स्थळी अमरण उपोषणास बसलेले चिमेगाव सी. एस., लाखे डी. के., नागणपल्ले एन. एम., कोळ्ळे आर. डी., वाघमोडे व्हि. व्हि. यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न समजून घेऊन लातूर जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी हैबतपुरे सर आणि वरिष्ठ लिपिक राक्षे सर यांच्याबरोबर चर्चा करून सदरील शिक्षकांचे पगाराबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाबाबतचा योग्य तो मार्ग काढला. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी माजी मुख्याध्यापक नागणपल्ले सर यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शिक्षकांच्या सेवा पुस्तिका विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक अडसूळ सर यांच्याकडे प्राथमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी हैबतपुरे सर यांच्या कार्यालयात व्यंकटराव पनाळे, किशोर माने, समीर चव्हाण यांच्यासमक्ष हस्तांतरित करण्यात आल्या. व त्यानंतर पगार वाटपासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू झाली. आणि मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मिटवून अमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
_____________
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.