*भिम आर्मीचे अध्यक्ष तथा आझाद* *समाज पार्टीचे सुप्रीमो* *भाई चंद्रशेखर रावण याना झेड प्लस* *सुरक्षा प्रदान करण्यात यावी*
*भिम आर्मीचे औसा* *तालुका अध्यक्ष समाधान कांबळे* *यांनी केली*मागणी*
*औसा ;प्रतिनिधी*
औसा:- भिम आर्मीचे सुप्रीमो हे देशभरात अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत फिरत असतात सध्या बिहार मधील उमेदवाराच्या रॅली संदर्भात गेले असता तेथील आज्ञातिकडून गोळीबार करण्यात आला आहे भाई चंद्रशेखर आझाद याना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावे म्हणून औसा चे तहसीलदार यांचे मार्फत भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडे निवेदन द्वारे मागणी केले आहे
२५ ऑक्टोबर रोजी संविधान रक्षक भिम आर्मी भारत एकता मिशन चे सुप्रीमो आझाद समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आझाद (रावण) गाडीच्या ताफ्यावर आज्ञातकडून गोळी बार करण्यात आला याचा सर्व प्रथम मी निषेध नोंदवतो
बुलंदशहर येथील येथील निवडणूक च्या रिंगणात आझाद समाज पार्टी च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गेले असता तेथील भाईंच्या रॅली च्या अंदाजानुसार विरोधी पार्टीच्या उमेदवाराचा प्रभाव होणार हे त्यांना कळून आले मूळे आपला प्रभाव होईल या भीतीने भाई चंद्रशेखर आझाद हे परतत असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज्ञाताकडुन गोळीबार करण्यात आला यात यावेळी कोणालाही हानी झाली नाही .गोळीबार केल्यावर तेथील परिस्थितीत भीतीचे वातावरण निर्माण होईल असे जर त्यांना वाटत असेल तर अरे भीतऱ्यांनो याद राख आम्ही तुमच्या गोळीबाराला घाबरून जाणारे नाहीत .आमच्या रक्तातच भिमाचे चळवळ आहे आणि ते आम्ही अविरत पणे चालूच ठेवणार .ते काम भाई चंद्रशेखर आझाद हे करत आहेत म्हणून भाई चंद्रशेखर याच्या केसाला जर धक्का लागला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील हे ध्यानात घ्यावे .आम्ही संविधानला मानणारे लोक आहोत म्हणून आमच्या नेत्याची सुरक्षा करण्यासाठी आमी सक्षम आहोत पण सरकार चे ही काय कर्तव्य आहे की नाही
म्हणून भाई चंद्रशेखर आझाद (रावण)याना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणून केंद्रसरकार च्या गृहमंत्रालयाकडे मागणी करण्यात येत आहे उत्तर प्रदेश सरकाने ही त्वरित सुरक्षा देण्याची तसदी करावी असा इशारा भिम आर्मीचे औसा तालुका अध्यक्ष समाधान कांबळे यांनी दिला आहे यावेळी निवेदनावर तालुका सचिव अविनाश कांबळे दत्त गजगे तुषार कांबळे अमोल कांबळे सुशील शिंदे ऋतिक शिंदे वैभव कांबळे दत्तू कांबळे राहुल कांबळे अतिष कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.