*रामनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी व सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक पदी ॲड.उमेश शिवाप्पा पाटील यांची बिनविरोध निवड*
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील आलमला येथील श्री रामनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी व लातूर येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक पदी ॲड.उमेश शिवाप्पा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दि.23.10.20 रोजी श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सोपानकाका आलमलेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाप्पा शिवराम पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र ॲड.उमेश शिवाप्पा पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्था सचिव प्रा.जी.एम. धाराशिवे, सहसचिव प्रभाकर कापसे, कोषाध्यक्ष चनबसअप्पा निलंगेकर, सदस्य मन्मथआप्पा धाराशिवे , शिवाजी आंबूलगे व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत होते.
योगायोग म्हणजे सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक पदी सुद्धा ॲड.उमेश शिवाप्पा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल ॲड.उमेश पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
ॲड.उमेश पाटील यांनी दोन्ही संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे व्यक्तिशः आभार व्यक्त केले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.