दोन अज्ञात चोरट्यांकडून बालाजी कापड मॉल फोडण्याचा प्रयत्न.....
एस ए काझी
औसा प्रतिनिधी/-औसा शहरातील याकतपूर रोड लागत नव्याने सुरू केलेल्या बालाजी कापड मॉल फोडण्याचा प्रयत्न अज्ञात 2 चोरट्यांकडून करण्यात आल्याची घटना गुरुवारी दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्री 2 : 30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी बालाजी सूर्यवंशी यांनी दसरा- दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर औसा तालुक्यातील ग्राहकांसाठी नामवंत व दर्जेदार कंपनीच्या कापडाचे भव्य दालन सुरू केले असून पंधरा दिवसातच चोरट्यांकडून मॉल फोडण्याचा प्रयत्न झाला. रात्री 2 : 30 च्या सुमारास लोखंडी सळईने मॉलचे शटर उचकावून काचावर, सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी फोडल्यामुळे औसा शहराची सुरक्षितता धोक्यात आली आहे. नुतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु औसा येथे अज्ञात चोरट्यांनी बालाजी कापड मॉल फोडण्याचा प्रयत्न करीत औसा पोलीसां समोर आव्हान दिले आहे. औसा पोलीस स्टेशन मार्फत रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविणे आवश्यक आहे. रात्री-अपरात्री चोरटे पोलीसांच्या गस्तावर लक्ष ठेवून चोरटे पोलीसांना चकमा देत आहेत. बालाजी कापड मॉल हे शहराच्या नवीन वस्तीमध्ये झाले असून या परिसरात पोलीसांनी गस्त वाढवावी आणि या परिसरातील व्यवसायिक व रहिवाशांचे रक्षण करणे आवश्यक आहे. औसा पोलीसांच्या समोर अज्ञात चोरट्यांनी कापड मॉल फोडण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस खात्यासमोर आव्हान उभारले आहे. या घटनेची बालाजी सूर्यवंशी यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.