महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

 *महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन





औसा मुख्तार मणियार

औसा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने औशात  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 130 व्या‌ पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी औसा येथील शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई चनबसप्पा केवळराम गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय धनगर समाजाचे अध्यक्ष अॅडवोकेट गुंडेरावजी बनसोडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर अॅडवोकेट गुंडेरावजी बनसोडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते किशन कोलते यांनी आपले विचार व्यक्त केले यामध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील महिला व दीनदलितांच्या उध्दार केला त्यांच्या जन्मामुळे  ते शक्य झाले अन्यथा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालाच नसता तर ही लोक आजही खितपत पडले असते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुंडेराव जी बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त करताना महात्मा फुले यांच्या जीवनावर समग्र प्रकाश टाकून आज त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करुन राष्ट्रीय एकात्मता साधण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमास ज्ञानांकुशचे संपादक श्री वामन अंकुश त्याचप्रमाणे सुवर्ण पुष्पचे संपादक किशोर जाधव पत्रकार, एम बी मणियार, क्राईम संध्याचे तालुका प्रतिनिधी शिवाजी मोरे, करणी सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख अनिल जमादार, पत्रकार सचिन जाधव, गणेश तेलंग, श्याम गोरे, बालाजी माने बालाजी तौर, विनोद साळुंके, राम नरवडे, भोसले मातोळा, गोपाळ माळी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै प्रतिव्यवहारचे तालुका प्रतिनिधी रामभाऊ कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर माळी यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या