भीमआर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश चा अभिनव उपक्रम
सशक्तभारत - जाती मुक्त भारत अभियानाची सुरवात
मुंबई प्रतिनिधी :
२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिना निमित्त महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भीमआर्मी ने वेगवेगळे उपक्रम राबवले. त्याच वेळी मुंबई येथे चैत्यभूमी वर जाऊन भीमआर्मी महाराष्ट्र व मुंबई टिमने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भीमआर्मीचे महाराष्ट्र प्रभारी यांनी तिरंगा फडकावून *सशक्तभारत- जाती मुक्त भारत* या अभियानची सुरवात केली. चैत्यभूमी येथे भीमआर्मी महाराष्ट्र प्रभारी मा. दत्तू मेढे जी व महाराष्ट्र प्रदेश प्रमुख मा. नेहाताई शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मा. नेहाताई शिंदे यांनी संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन केले. मुंबई अध्यक्ष दिपक हनवते यांनी महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे जी यांना संविधान देऊन संपुर्ण टिमतर्फे त्यांचे स्वागत केले. चैत्यभूमी वर उपस्थित असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांना महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे कोषाध्यक्षा मंगलाताई गायकवाड, मुंबई अध्यक्ष दिपक हनवते, प्रियांका वाघमारे यांनी संविधानातील उद्देशिकेची प्रत भेट देवून *सशक्त भारत, जाती मुक्त भारत* या भीमआर्मी च्या अभियान साठी सहयोग करण्यास सांगितले. भीमआर्मी महाराष्ट्र च्या वतीने संविधान गौरव दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप करण्याआधी २६/११ च्या मुंबई वर झालेल्या भ्याड ह्यातील शहिद पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीमआर्मी च्या वतीने श्रद्धांजलि अर्पण करून मा वंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन हे कोअर कमिटी प्रमुख राजू झनके व महासचिव अविनाश गायकवाड यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय कमिटी सदस्य एवं गुजरात प्रभारी अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे, महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे, कोषाध्यक्ष मंगलाताई गायकवाड, मुख्य महासचिव मनिष साठे, अविनाश गायकवाड, सुनिल गायकवाड, उपाध्यक्ष कैलाश जैस्वार, राहूल वाघ, रणधीर आल्हाट, प्रवक्ता रमाकांत तायडे, कोअर कमिटी प्रमुख राजू झनके, संजय बोपेगावकर, रमेश बालेश, कोकण प्रमुख अशोक शिंगाडा, मुंबई अध्यक्ष दिपक हनवते, प्रदेश चितळे, संघटक विजय कांबळे, दहिसर विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे, प्रियांका वाघमारे, संतोष वाकळे, योगेश सावंत, संतोष वाकोडे, उपासक गायकवाड, अविनाश समिंदर, अमित जगताप, हारून खान, श्रीकांत धावारे, बिंद्रहास राव, वरिष्ठ कार्यकर्ता सुदेश शिंदें सरांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.