केंद्र सरकारच्या सोलापूर विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती वर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा भिमाशंकर राचट्टे यांची नियुक्ती
औसा मुख्तार मणियार
केंद्र सरकारच्या सोलापूर विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती वर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा भिमाशंकर राचट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती दि.२७ नोव्हेंबर 2020 शुक्रवार रोजी औसा येथे पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, शहराध्यक्ष लहु कांबळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अच्युत पाटील, अॅड अरविंद कुलकर्णी,गोडबिले मॅडम यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती. यावेळी प्रा भिमाशंकर राचट्टे यांनी सांगितले केंद्र सरकारच्या सोलापूर विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती वर शासनाने मला तिथे काम करण्याची संधी दिली. केंद्रातले आदरणीय मोदी सरकार भाजपचे सरकार मजबूत पणे काम करत आहेत.याभागाचे रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हि नामोनिशाण मला दिले आहे यासाठी या तालुक्याचे आमदार अभिमन्यु पवार, लातूर चे खासदार सुधाकर शृंगारे, संभाजी पाटील निलंगेकर, सुशील दादा बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, अॅड अरविंद कुलकर्णी या सगळयानी मला सहकार्य केले.माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यासाठी मी खरा उतरेन असे पत्रकार परिषदेत सांगितले.औसा पत्रकारातर्फे प्रा.भिमाशंकर राचट्टे यांचा सत्कार करण्यात आले व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगीऔसा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे सर, रमेश दुरुगकर, काशीनाथ सगरे, विजयकुमार बोरफळे,दत्ता व्हंताळे,जलील पठाण, रामभाऊ कांबळे, विनायक मोरे, विवेक देशपांडे,आसिफ पटेल,एस ए काझी, मुख्तार मणियार, इलयास चौधरी रोहित हंचाटे, विनोद जाधव, विजय बिराजदार आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.