चर्मकार महिलांवरील अत्याचार प्रकरणी धराधमांना फासावर लटकवा,राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी
लातूर दि.१७- कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यात घडलेल्या चर्मकार मुलीवर अत्याचार प्रकरणी नराधमांना फासावर लटकवा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात चर्मकार समाजाच्या मुलीवर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात २० वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली असून जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन विष पाजून खून करण्यात आला आहे.
कोल्हापूर आणि जळगाव या दोन जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडल्या असून एका मुलीचा प्राण गेला या घटनेने महाराष्ट्र हादरला असून निंदनिय घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.
आरोपींना कडक शासन करुन लवकरात लवकर फासावर लटकवा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष सी.के.मुरळीकर,जिल्हाध्यक्ष बिभीषण सांगवीकर,शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष धर्माजी उदबाळे,शहराध्यक्ष रवि कुरील,सामाजिक कार्यकर्ते बालाजी साबळे सचिव प्रविण नाबदे,माजी जिल्हाध्यक्ष अनिल कबाडे,बाबुराव कांबळे,शिवाजी दामावले,धोंडीराम सुर्यवंशी,विलास सोनवणे,चंद्रकांत कांबळे,सचिन सुरवसे यांनी कैली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.