माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त औशात युवक काँग्रेसतर्फे ब्लँकेट वाटप
औसा/ मुख्तार मणियार
भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त औसा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने गरीब गरजूंना चादर आणि ब्लॅंकेटस वाटप करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या सूचनेवरून युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनमंत राचट्टे यांच्या नेतृत्वात औसा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवार दिनांक 2020 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या यांच्या हस्ते हिवाळ्याचे दिवस असल्याने सुमारे 250 गरीब गरजूंना ब्लॅंकेट व चादर अशा उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीने प्रथमच दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आहे आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद चे माजी सभापती भोसले, प्रदेश सचिव अमर खानापुरे, माजी पंचायत समिती सभापती दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, जिल्हा निरीक्षक अभय देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दीपक राठोड, जिल्हा उपाध्यक्ष सुलतान शेख, औसा विधानसभा अध्यक्ष हनमंत राचट्टे, रौफ शेरीकर, विश्वराजऔटी , युवक काँग्रेस सरचिटणीस बजरंग बाजुळगे, धनराज जाधव, अजमेर शेख, इजहार सौदागर, केदार रेड्डी, अंकुर बनकर, रोहित भोरके यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपावली विशेष अंक
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.