शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवसायासाठी स्वातंत्र्य काउंटर देऊन जनतेचे हेळसांड थांबवा - एमआयएम प्रमुख औसा...
एस ए काझी
औसा प्रतिनिधी /- शहरातील राष्ट्रीयीकृत बँका तसेच भारतीय स्टेट बँक शाखा औसा मध्ये कर्मचारी कमी असल्याने औसा तालुक्यातील बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. बॅंकेच्या खातेदार व येणाऱ्या नागरिक, महीला, विद्यार्थी तसेच वृद्धांची हेळसांड होत असल्याने भारतीय स्टेट बँक शाखा औसा चे महाराष्ट्र राज्याचे जनरल मॅनेजर औसा येथे दौऱ्यावर आले असता औसा एमआयएम प्रमुख मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, औसा तालुक्यातील अंदाजे 119 गावे आहेत. या तालुक्यातील बँक व्यवहारासाठी खातेदारांना व व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच कर्मचारी अपुऱ्या कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत आहे. याचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी वारंवार तक्रार करूनही अद्याप बँकेत व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेषता कर्ज वितरणापासून अल्पसंख्यांक समाजाला दुर्लक्षित केले जात आहे. केंद्र राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रणालीस गजर दाखवण्याचे काम केले जात आहे. तसेच बँकेच्या ग्राहकांना शैक्षणिक कर्ज, व्यवसाय कर्जासाठी अनेक वेळा चक्रा व हेलपाटे घालावे लागत आहेत. कर्ज प्रकरणे प्रलंबित पडले आहेत. निकाली काढण्यास अद्यापही असमर्थ दाखवीत आहेत. अशा अनेक तक्रारी असल्याने भारतीय स्टेट बँकेचे व्यवहारासाठी स्वतंत्र काउंटर देण्यासाठी मागणी होत आहे. या व्यतिरिक्त कर्ज प्रकरणासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. कागदपत्रे गोळा करून कर्जही वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. स्टेट बँक औसा शाखा ही शहरातील जुनी बँक शाखा असल्यामुळे तालुक्यातील व शहरातील अनेक खातेधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी वारंवार बँक अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही त्यावर कारवाई होत नाही व स्वातंत्र्य काऊंटर देण्यास बँक कर्मचारी असमर्थता दाखवित आहेत. या मागणीकडे व जनतेची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी व बँक खातेदारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी बँक कर्मचारी असमर्थता दाखवित आहेत. अशा राष्ट्रीयीकृत बँका विषयी जनतेत रोष निर्माण होत आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकात स्वातंत्र्य काउंटर चालू करावे असे निवेदन एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी यावेळी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.