महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ लातूर च्या वतीने 1 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर

 


  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ लातूर च्या वतीने 1 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर 



लातूर: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता वर्षाच्या प्रारंभी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेने रक्तदान करावे, असे जाहीर आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर 1 जानेवारी 2021 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंतराव मुढे,राज्य संघटक संजय भोकरे,राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे व मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे‌. या निमित्ताने लातूर जिल्हा शाखेच्या वतीने व  महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून जास्तीत जास्त जनतेने रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय सचिव दिपरत्न निलंगेकर, उपाध्यक्ष दयानंद जडे, जिल्हाध्यक्ष अशोक देडे, शहराध्यक्ष महादेव डोंबे,जिल्हा सचिव अशोक हनवते, कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे, उपाध्यक्ष संगम कोटलवार, श्रीधर स्वामी, लिंबराज पन्हाळकर, प्राचार्य डॉक्टर सिद्राम डोंगरगे, एनसीसी चे प्रमुख कॅप्टन डॉक्टर बाळासाहेब गोडबोले,एनएसएस प्रमुख रत्नाकर बेडगे, डॉक्टर संजय गवई,शिवप्रसाद डोंगरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या