शेती व्यवसाय फायदयाचा ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन काढावे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लक्ष्य एकरी १५० मे़ टन ऊस तोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ

 

शेती व्यवसाय फायदयाचा ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी

अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन काढावे

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लक्ष्य एकरी १५० मे़ टन ऊस तोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ









 

 लातूर प्रतिनिधी : २५ डिंसेबर २०:

    शेती व्यवसाय फायदयाचा ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी अदयायावत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करायला हवेत असे सांगून प्रयोगशिल शेतकऱ्यांना शासन तसेच साखर कारखान्याच्या वतीने योग्य माग्रदर्शन व आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षणसांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

   विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बाभळगाव येथे आयोजित लक्ष्य ऐकरी १५० मेट्रीक टन ऊस तोडणी पथदर्शी प्रकल्पचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री  अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि़ २५ डिसेंबर रोजी करण्यात आलात्याप्रसंगी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख बोलत होते़ कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.    

      यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुखसौ़ अदितीताई अमित देशमुखमाजी आमदार वैजनाथराव शिंदेमाजी आमदार त्र्यंबक भिसेजिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुखराज्य साखर संघाचे आबासाहेब पाटीलरेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरेव्हाई्स चेअरमन अनंतराव देशमुखसंत शिरोमणी मारोती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगेविलासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगेबाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

  विकासरत्न विलासराव देशमुखसहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे नेतृत्व  त्यांच्या विचार आपण सर्वांनी स्वीकारलेला आहे़ त्यामुळे त्यांनी दिलेला आधुनिक विचार सर्वांनी स्वीकारणे आवश्यक आहेअसे नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले कीशेतात आता गुणात्मक वाढ झाली पाहिजे़ केद्र  राज्य सरकारच्या वतीने कृषीच्या अनेक योजनाअनुदानकर्जपूरवठा केला जातो आहे़ या योजनांचा प्रत्येक शेतकºयांनी लाभ घेतला पाहिजे़ ऊसाचे उत्पादन आणखी वाढले पाहिजे़ दरडोई उत्पन्न वाढले तर शेतकºयांच्या हातात जादा पैसा येईलतो पैसा बाजारपेठेत येईल आणि सर्वत्र आर्थिक सुबतता येऊ शकते. विलास सहकारी साखर कारखान्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस उत्पादकांमध्ये हेक्टरी ऊस उत्पादकता वाढीस प्रोत्साहन मिळावे म्हणुन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी एकरी १५० मे़ टन ऊस उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे़. या प्रकल्पाची प्रेरणा घेऊन शेतकऱ्‍यांनी आधुनिक पद्धतीने ऊस लागवड हाती घावीअसेही आवाहन केले.

   यावेळी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी ऊस लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली़ प्रारंभी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लक्ष्य १५० मेट्रीक टन ऊस तोडणीचा शुभारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक जयदेव बर्वे यांनी केले़ पाहुण्यांचे स्वागत विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळेसंचालक युवराज जाधवअनंत बारबोलेभैरवनाथ सवासेगुरुनाथ गवळीबाळासाहेब बिडवेनारायण पाटीलअमर मोरेअनिल पाटीलरणजित पाटीलगोविंद डूरेसूर्यकांत सूडेअमृत जाधवरामदास राऊतसुभाष मानेभारत आदमानेसंजय पाटीलज्ञानोबा पडीलेकार्यकारी संचालक जिवाजी मोहितेसतिष गजभारतुकाराम कानिटकर यांनी केले़. सुत्रसंचालन राहूल पाटील यांनी केले तर व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी आभार मानले़ 

चौकट 

आईचे धाडस

   विकासरत्न विलासराव देशमुखसाहेबांनी नेहमीच आधुनिक शेतीला प्रोत्साहन दिले़ आई आणि वडिलांमध्ये शेतीविषयी सहज चर्चा झाली आणि आर्इंनी शेतीकडे लक्ष दिले़ शेतात आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनव्या प्रयोगाला आर्इंनी सुरुवात केली़ एकरी १५० मेट्रीक टन ऊस उत्पादनाकरीता दोन प्रात्यक्षिक प्लॉट तयार केलेहे खुप मोठे धाकस आर्इंनी केलेअसे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले़ 

चौकट 

बाभळगावात ४८ कांड्यांचा ऊस

   पश्चिम महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त कांड्यांचा ऊस असतोअसे आपण सर्वजण ऐकुन होतो़ मात्र हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?,  हे आपणही करुन दाखवूनअसा ध्यास आइर््ंनी घेतला आणि आज बाभळगावात ४८ काड्यांचा ऊस उभा आहे़ जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकºयांनी आवर्जून बाभळगावला यावे  हे प्रात्यक्षिक प्लॉट पहावेत़ तसेच महाराष्ट्रा जिथे जिथे शेतीवर आधुनिक प्रयोग होत आहेतअशा शेतीला आपल्या शेतकºयांनी भेट देऊन पहाणी करावीयासाठी विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रयोगशील शेतकºयांच्या सहलींचे आयोजन करावेअसे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले़

--------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या