आ. अभिमन्यू पवार यांनी स्वच्छता मोहिमेतून वाहिली अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त औसा शहरात स्वच्छता मोहीम.
औसा - माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त दि.२५ डिसेंबर रोजी पहाटे आमदार अभिमन्यू पवार,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी औसा शहरात स्वच्छता मोहीम राबवून त्यांना आदरांजली वाहिली. व अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोहिमेची सांगता करण्यात आली.
औसा शहरातील बस स्थानक ते नगरपालिका मार्गवर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करत अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे,सुशीलदादा बाजपाई, अॅड. मुक्तेश्वर वाघधरे, अॅड. अरविंद कुलकर्णी, गटनेते सुनील उटगे,संतोषअप्पा मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमाशंकर राचट्टे,किराणा असोशियशन अध्यक्ष सुरेश ठेसे,सहसंघटक भिमाशंकर मिटकरी,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय परसणे,दत्ता चेवले, कल्पना डांंगे, नगरसेवक गोपाळ धानूरे, समीर डेंग, अॅड. मोहिनी पाठक, सोनाली गुळबिले, शिव मुरगे,पप्पूभाई शेख, पवन राचट्टे, जयश्री घोडके,श्रीराम पाटील, गंगाधर इसापुरे, नितिन शिंदे, मकरंद रामपुरे, सागर अपुणे,आदिल शेख,वाहिद चाऊस,जगदिश चव्हाण,आदीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूर शहर कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेचे पूजन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पुजन करून त्यांना आदरांजली वाहिली याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, दयानंद सरस्वती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, ललीत तोष्णीवाल, अजय भुमकर, सतीश ठाकूर,दत्ता चेवले, रवीशंकर केंद्रे आदी उपस्थित होते..
देखें वीडियो
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.