*एक वृक्ष लावुन त्याचे पालन-पोषण करून प्रत्येक कुटुंबाने निसर्ग देवतेची पूजा करावी*.
प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांचे आवाहन.
लातुर : दि. २६ - { प्रतिनिधी } - लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदार येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लावून त्याचे पालन पोषण करून निसर्ग देवतेची पूजा करावी, असे आवाहन केले.
ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ग्रामपंचायत सदस्य भगवान भालेराव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वप्रथम छत्रपती श्री. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरदार वल्लभाई पटेल या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण समारंभानंतर लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते लातूर ग्रंथोत्सव ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या वारकरी बंधू-भगिनीं सर्वश्री व्यंकट महाराज उपाडे, शिवाजी सगर, निवृत्ती माळी, विनोद जटाळ, सुलचंद माळी, विलास कांबळे, उत्तम कांबळे, निवृत्ती तिगीले, शंकर आयलाने, रहिमतुल्ला कबाडे, हरिपाल मुळे, संतराम गोरे, नरसिंग आयलाने, श्रीमती मंगल सुरकुटे शांताबाई तिगीले, सुनीता गुरमे, महानंदा चामे, पार्वतीबाई आयलाने, रुक्मीन सोनवणे, सुदेशना तिगीले, सुलभा कातळे, काशीबाई पनाळे, लता पनाळे यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते गरजू व होतकरू विद्यार्थी आशिष सगर, रोहन कांबळे, प्रतीक्षा कांबळे, गायत्री गोरे, नंदिनी खरोसे, सोहम मोरे, रोहित बोके, पूजा जाधव, प्रेमनाथ बंडगर इत्यादिना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे श्री आर. व्हि. करकिले सर, श्री एस. बि. शिवनगे सर, माजी सरपंच डॉ. राम गजधने, रामचंद्र तिगीले, बबन लोंढे, श्रीमती मिराबाई तिगीले, हाजी बाबा शेख, निवृत्तीराव तिगीले, गहिनीनाथ बरुरे, पांडुरंग बंडगर, गणेश सगर, आकाश पाटील, नरसिंह सगर, राम पाटील, विठ्ठल गुरमे, बंडू तिगीले, शत्रुघन बंडगर, गणेश चिमले, रामचंद्र बरुरे, वैभव तिगीले, तुकाराम सोनवणे, महादेव गुरमे, सुधाकरआप्पा चन्नावार, संभाजी पडिले, बळीराम सूर्यवंशी महाराज, तोरंबे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.