२१२ बुथवरून
झाले लसीकरण
लातूर/प्रतिनिधी: महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.शहरांतर्गत ४५ हजार बालकांना लसीकरण करण्यासाठी २१२ बुथची स्थापना करण्यात आली होती.या बुथवर सायंकाळपर्यंत लसीकरण करण्यात आले.
भारत हा पोलिओमुक्त देश असला तरी ०ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओची बाधा होऊ नये यासाठी देशपातळीवर रविवार दि.३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनेही यात सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.
रविवारी सकाळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते लेबर कॉलनीतील रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल,आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख,उपायुक्त शशीमोहन नंदा,नगरसेविका पुजा पंचाक्षरी,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.महेश पाटील,स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल वाघमारे,डॉ.अशोक धुमाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.धुमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
लसीकरण मोहिमेची पालिकेने जय्यत तयारी केली होती.शहरांतर्गत ४५हजार बालकांना लसीकरणाचे उद्दीष्ट होते.त्यासाठी एकूण २१२ बुथची स्थापना करण्यात आली होती.त्यात १९२ पोलिओ बुथ,१७ ट्रान्झिट टीम व ३मोबाइल टीमचा समावेश होता.या मोहिमेसाठी एकूण ३४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत हे बुथ कार्यरत होते.इंडियानगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत ३५,राजीव नगर केंद्राअंतर्गत २१,गौतम नगर आरोग्य केंद्र अंतर्गत ३७, प्रकाशनगर केंद्र अंतर्गत ३२,
बौद्धनगर केंद्र अंतर्गत २०, अन्सारनगर केंद्र अंतर्गत २३, मंठाळेनगर केंद्र अंतर्गत २८ व तावरजा कॉलनी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत १६ बूथ स्थापित करण्यात आले होते.याशिवाय तीन मोबाईल टीम राखीव ठेवण्यात आल्या होत्या.या सर्व केंद्रावरून सायंकाळपर्यंत बालकांना लसीकरण करण्यात आले.
महापौरांच्या बाळालाही पोलिओचा डोस...
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या तान्ह्या बाळालाही पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी पोलिओचा डोस देण्यात आला. महापौर गोजमगुंडे,
त्यांच्या अर्धांगिनी सौ वर्षा यांनी मंठाळे नगरातील मंठाळे नगर येथील बुथवर जाऊन ८ महिन्याचे सुपुत्र विरांश यास पोलिओ चा डोस दिला.
५० हजार पत्रकांचे वितरण ...
प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत प्रथमवेळी गर्भवती असणाऱ्या मातेला ५ हजार रुपयांचा लाभ शासनाकडून दिला जातो.या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक बुथवर योजनेची माहिती देणारी पत्रके ठेवण्यात आली होती.डोस देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्याचे वितरण करण्यात आले.एकूण ५० हजार पत्रके वितरित करण्यात आली.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, मनपा आयुक्त अमन मित्तल, यांनी यावेळी बोलताना केले.
चौकट
काळजी घेऊन लसीकरण....
पालिकेच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या प्रत्येक बुथवर कोविड १९ च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लसीकरण करण्यात आले.लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक होता. प्रत्येकाला ग्लोव्हज देण्यात आले होते.प्रत्येक बालकाला डोस दिल्यानंतर हात कर्मचाऱ्यांकडून हात सॅनिटाईझ केले जात होते. रविवारची लसीकरण मोहीम पार पडल्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरी जाऊन उर्वरित बालकांना लसीकरण केले जाणार आहे.ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे त्यांच्या पालकांनी या मोहिमेत लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
लातूर मनपाची जय्यत तयारी
लसीकरण मोहिमेची पालिकेने जय्यत तयारी केली होती.शहरांतर्गत ४५हजार बालकांना लसीकरणाचे उद्दीष्ट होते.त्यासाठी एकूण २१२ बुथची स्थापना करण्यात आली होती.त्यात १९२ पोलिओ बुथ,१७ ट्रान्झिट टीम व ३मोबाइल टीमचा समावेश होता.या मोहिमेसाठी एकूण ३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.