महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान व कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित.
औसा मुखतार मणियार
औसा: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे औसा येथे दि.27 जानेवारी 2021 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता कोरोना योद्धा पुरस्कार तथा रक्तदान शिबिर नगर परिषद औसा येथे घेण्यात आले.या शिबिरात औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व डॉ.स्वाती फेरे यांनाही कोरोना योद्धा म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शाल ,पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार अभिमन्यू म्हणाले की कोरोना च्या काळामध्ये अफसर शेख यांनी लोकांना मदतीला धावून येऊन किट वाटप केले व हजारो गोर गरीब यांना त्यांनी धीर दिला.
आपल्या सत्काराच्या उत्तरार्थ बोलत असताना डॉ. अफसर शेख म्हणाले की, कोरोना च्या काळात जनतेचे दुःख आणि त्यांचा अडचणी मी जवळून पाहिले आहेत. माझ्या परीने आणि औसा नगर परिषदेच्या वतीने जनतेसाठी जे काही करता आले किंवा शक्य होते .ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून , औसा नगर परिषद सर्व नगरसेवक ,अफसर शेख युवा मंच ,नगरपालिका कर्मचारी या सर्वांचा आहे. यापुढेही मी जनतेची सेवा विनम्रपणे करीत राहील असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार अभिमन्यु पवार ,मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ,पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, मनोगत चे संपादक राजू पाटील ,भाजपा युवा नेते संतोषप्पा मुक्ता ,पोलीस निरीक्षक नृसिंह ठाकुर या रक्तदान शिबिराचे आयोजक तथा संघाचे तालुकाध्यक्ष आसिफ पटेल यांच्यासह पत्रकार , न प कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.