महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेकरिता लातूर जिल्ह्याच्या 19 वर्षीय क्रिकेट संघाची निवड 26 फेब्रुवारी रोजी

 महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निमंत्रित  साखळी  क्रिकेट स्पर्धेकरिता  लातूर जिल्ह्याच्या 19 वर्षा आतील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या निवडीकरिता दिनांक 1 सप्टेंबर 2002 नंतर चा जन्म असणारे खेळाडू पात्र असतील. सदरील निवडीकरिता रुपये तीनशे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. या निवडीकरिता सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अशी माहिती लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव प्रा भारत चामले यांनी दिली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या