*लातूर जिल्हावासीयांनी शनिवार व रविवार स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा*
**जिल्हाधिकारी पृथवीराज बी. पी*
लातूर, दि.24(जिमाका):- राज्यभर कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील स्थिती तुलनेने चांगली आहे. माञ कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता यावा यासाठी शनिवार आणि रविवारी लातूर जिल्हावासीयांनी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा व विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
फेसबुक लाईव्ह संवादाच्या माध्यमातून बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की आजघडीला लातूर जिल्ह्यात रूग्णांची संख्या 397 इतकी आहे. परिस्थिती नियंञणात आहे. लोकांनी घाबरून जाण्याची परिस्थती नाही. जिल्हा प्रशासन कोणतीही परीस्थिती हाताळायला सज्ज आहे. माञ कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लातूर जिल्हावासीयांनी येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे. व स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा. जेणेकरून कोवीड-19 विषाणूची साखळी आपल्याला तोडता येईल, असे त्यांनी सूचित केले.
त्याचबरोबर नागरीकांनी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सतत हात धुणे याचा अवलंब करावा. मंगल कार्यालयांसारख्या ठिकाणी होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथवीराज बी. पी. यांनी केले आहे. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यावेळी म्हणाले की नागरीकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. महत्वाच्या चौकांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. नागरीकांनी या पथकांना सहकार्य करावे. अनावश्यक वाद घालणे टाळावे, असे ते म्हणाले.
*********
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.