लातूर जिल्हा न्यायालयाचे लायब्ररी नूतनीकरण तसेच नव्या "आय. टी. लायब्ररी"चे उद्घाटन संपन्न झाले..!
लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना डी.पी.डी.सी. अंतर्गत सुमारे रू. 15 लाख अर्थसहाय्य मंजूर करून दिले होते. त्यातून अत्यंत आधुनिक स्वरूपाची लायब्ररी वकील मित्रांना उपलब्ध झाली, याचा अत्यंत आनंद होत आहे.
आमच्या अक्का आम्हाला शिकवतात, की पद असो किंवा नसो आपण प्रामाणिक कार्य करत राहायचे. त्याप्रमाणेच आमचा प्रयत्न असतो. त्याचेच फळ म्हणून की काय, आज ते पद नसतानाही कृतज्ञतापूर्वक या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून निमंत्रित केले गेले. पदाच्या पुढे जाऊन सर्वपक्षीय वकील मित्रांशी असलेले ऋणानुबंध किती खोलवर रुजले आहेत, याचेच हे द्योतक आहे.
न्यायालयाच्या विविध व्यवस्थापकीय इमारती शहरात विविध ठिकाणी असल्याने नागरिकांची आणि वकील बांधवांची गैरसोय होत आहे. एकाच ठिकाणी सर्व कार्यालये झाल्यास सर्वांच्याच दृष्टीने सोयीचे होईल, हा विषय आपण पुढे घेऊन जाऊ आणि लवकरात लवकर सर्वांच्या सोयीचे असे भव्य कार्यालय या ठिकाणी उभे राहील यासाठी प्रयत्न करू. या संकल्पनेस सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य ॲड. श्री. अण्णाराव पाटील जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांतजी आगरकर उपस्थित होते. लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव तथा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरणजी जाधव, उपाध्यक्ष ॲड. सचिनजी पंचाक्षरी, महिला उपाध्यक्ष ॲड. प्रतिभाताई कुलकर्णी, कोषाध्यक्ष ॲड. गणेशजी गोजमगुंडे, ॲड. व्यंकट बेद्रे जी, ॲड. संभाजी पाटील जी, ॲड. जयश्रीताई पाटील, स्थायी समिती सभापती ॲड. दीपकजी मठपती, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वरजी चेवले आदी मान्यवर तसेच वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.