कचरा वर्गीकरण करून देणाऱ्यांना चांदीचे नाणे

माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत महापालीकेची अनोखी स्पर्धा 

प्रत्येक घंटागाडी मागे एका विजेत्यास मिळणार चांदीचे नाणे


 लातूर/प्रतिनिधी: लातूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यात कचरा वर्गीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने चांदीचे नाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याद्वारे प्रत्येक घंटागाडी मागे एका विजेत्यास चांदीचे नाणे मिळणार आहे. शहरातील सुमारे १२० नागरिकांना असे नाणे मिळवता येणार आहे. राज्यात प्रथमच अशा पद्धतीने कचरा वर्गिकरणास प्रोत्साहन देण्याकरिता लातूर मनपाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रम अंतर्गत सलग तीन दिवस कचऱ्याचे वर्गीकरण करून देणाऱ्या नागरिकांना कुपन देउन लकी ड्रॉ च्या माध्यमातून चांदीचे नाणे जिंकता येणार आहे.
    स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानात महानगरपालिकेने सहभाग घेतलेला आहे. या दोन्ही अभियानाला गती देऊन शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी व प्रशासन मेहनत घेत आहे. शहरात दररोज कचरा संकलन केले जाते. त्यावर प्रक्रिया केली जाते. हे सर्व सुरू असले तरी कचरा वर्गीकरण हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.
दिनांक १ मार्च ते ६ मार्च दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या स्पर्धेअंतर्गत नागरिकांनी कचऱ्याचे ओला,सुका व घातक असे वर्गीकरण करून घंटागाडीला द्यावयाचे आहे. दररोज वर्गीकरण करून कचरा दिल्यानंतर घंटागाडी चालकाकडून संबंधित नागरिकाला कुपन दिले जाणार आहे. जे नागरिक किमान तीन दिवस कचरा वर्गीकरण करून देतील आणि तीन कुपन जमा करतील अशा सर्व नागरिकांच्या कुपनचे एकत्रीकरण करून त्याचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. प्रत्येक घंटागाडी करिता नेमून देण्यात आलेल्या ७०० घरांकरिता स्वतंत्रपणे ही योजना राबविण्यात येवून नागरिकासाठी एक चांदीचे कॉईन या लकी ड्रॉ मधून दिले जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरात एकूण १२० घंटागाड्या चालवल्या जातात. त्यामुळे अशी १२० चांदीची नाणी नागरिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत.
  शहरातील नागरिकांनी या अनोख्या स्पर्धेत सहभागी होऊन लातूर शहराला स्वच्छ व सुंदर करण्यात आपलेही योगदान द्यावे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१  व माझी वसुंधरा अभियानात लातूर शहराला राज्यात प्रथम क्रमांकावर आणावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, 

U

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या