शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेत अनुराग सावंत चे उज्ज्वल यश...
औसा प्रतिनिधी /
बीड येथील विद्यावार्ता या मॅगझिन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत मुक्तेश्वर विद्यालय औसा येथील अनुराग नेताजी सावंत यांने प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती लातूर यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेतही ऑफलाइन लहान गटातून अनुरागने प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच सारोळा - एरंडी येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक पटकावून विजयाची हॅट्ट्रिक केली.
अनुराग सावंत यांने अत्यंत प्रभावी भाषाशैलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकल्याबद्दल अनुराग सावंत याचा रोख रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी अभिजीत देशमुख व प्रमुख पाहुणे डॉ. सुरेखा निलंगेकर, डॉ. शुभांगी राऊत, डॉ.आदिमाया गवारे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन राऊत, समन्वयक अॅड. उदय गवारे, परिक्षक भीम दूनगावे, उपस्थित होते.
अनुराग सावंत च्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग अप्पा औटी, सर्व संचालक
मुख्याध्यापक जलसकरे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एरंडी - सारोळा, भुतमूगळी येथील सरपंच व उपसरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी
अनुरागच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.