विधवा,निराधार व वृद्ध महिलांना समित्यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा -पालकमंत्री अमित देशमुख

 





विधवा,निराधार व वृद्ध महिलांना समित्यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा

-पालकमंत्री अमित देशमुख

संजय गांधी निराधार योजना अनुदान समित्यांची नुकतीच नियुक्ती झालेली असून अध्यक्ष व सर्व सदस्यांनी कर्तव्य भावनेने काम करावे

 

लातूरदि.22  जिल्ह्यात नव्याने संजय गांधी निराधार योजना अनुदान समित्यांची रचना करण्यात आलेली असून त्यातील अध्यक्ष व सर्व समिती सदस्यांनी अत्यंत कर्तव्य भावनेने काम करून जिल्ह्यातील विधवापरित्यक्त्यानिराधार व वृद्ध महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तसेच एक ही लाभार्थी या शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता समित्यांनी घ्यावीअसे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.

      जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित संजय गांधी निराधार योजना अनुदान समित्यांच्या बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयलमहानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सुळउपविभागीय अधिकारी सुनील यादवनिवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगेतहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह लातूर शहर संजय गांधी निराधार योजना अनुदान समितीचे अध्यक्ष हकीम शेख व लातूर ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

       पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले कीसंजय गांधी निराधार योजना अनुदान समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. गरजू लाभार्थी तहसील कार्यालयात येऊन गर्दी करण्यापेक्षा समिती सदस्यांनी त्या त्या गावातील व त्या त्या वार्डातच आपल्या समाजसेवका मार्फत लाभार्थ्यांकडून कागदपत्रे एकत्रित करून घ्यावी व ती समितीपुढे ठेवून पात्र प्रकरणे मंजूर करावीत. या समित्यांची नुकतीच स्थापना झालेली असून पुढील काळात समित्यांनी माहिती घेऊन कर्तव्य भावनेने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        समित्यांनी  संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्कात राहून समितीचे कामकाज करावे तसेच वयाचा दाखल्यासाठी आधार कार्ड वरील जन्म तारीख ग्राह्य मानावी. तसेच समितीच्या काही अडचणी असतील तर समिती प्रमुखाने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडवून घ्याव्यात व पात्र लाभार्थ्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे पालकमंत्री देशमुख यांनी सूचित केले.

    प्रारंभी संजय गांधी निराधार योजना अनुदान समिती लातूर शहर चे अध्यक्ष हकीम शेख व लातूर ग्रामीण चे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी या योजनेत काम करताना येणाऱ्या अडचणी ची माहिती पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली व परिपुर्ण अर्ज देण्यासाठी समीतीच्या वतीने जनजागृती  करण्यात येणार असल्याचे सांगुन स्थानिक स्तरावरच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समीती कटिबद्ध असल्याचे सांगितले.

             

                                              ***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या