आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून...
*ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी मोहीम...*
(कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अभिनव उपक्रम)
मुरुड (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढताना दिसत आहे. बऱ्याच भागांमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे या दृष्टीने लातूर ग्रामीण चे आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दि. 26 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशाला पारूनगर येथील एकूण ५२ विद्यार्थ्यांची रॅपिड एंटीजन ही तपासणी करण्यात आली.
राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी मोफत झाली पाहिजे अशा सूचना आ. धीरज देशमुख यांनी आरोग्य विभागाला केल्या त्यानुसार मुरुड येथील जिल्हा परिषद शाळेतील 52 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 51 विद्यार्थी निगेटिव्ह आले असून एक विद्यार्थ्यांचा अहवाल हा अनिर्णीत असल्याने त्याची rt-pcr तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित २९८ विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून सोमवार पासून केली जाणार आहे.तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क वापरावेत, आपले हात स्वच्छ धुवावेत व गर्दीत जाणे टाळावे हा आ. धिरज देशमुख यांनी संदेश दिला असल्याची माहिती डॉ. दिनेश नवगिरे यांनी दिली.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात मुरुड पासून सुरू केल्या बद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक यांचे वतीने सरपंच अभयसिंह नाडे यांनी आ. धीरज विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ. मदन सूर्यवंशी , डॉ. गिरीश केंद्रे, राजाभाऊ पुंड ,मनीषा गायकवाड, केंद्र प्रमुख लता पांचाळ, मुख्याध्यापक दिलीप जाधव , दखनी पाशा, धर्मराज नागटिळक, राजेंद्र पांगळ व सर्व शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.