जनता करफ्यूला औशात अल्प प्रतिसाद
औसा प्रतिनिधी /- लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा असे आवाहन केले होते. मात्र औसा शहरात जनता करफ्यूला म्हणावा तसा प्रतिसाद पहिल्या दिवशी शनिवारी मिळाला नाही. औसा येथील व्यापाऱ्यांनी जनता कफ्फ्यूला संमिश्र प्रतिसाद दिल्याने अनेक व्यापारी प्रतिष्ठाने व व्यवसायिकांचे दुकाने सुरूच होती. किराणा व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरूच ठेवले होते. तसेच हॉटेल्स, कापड दुकान कृ षी से वा कें द्र, भाजीपाला फळविक्रेते छोटे व्यवसायिक व फेरीवाल्यांचा औसा बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सुवर्णकार व सराफ व्यापाऱ्यांनी मात्र बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. दोन दिवसाच्या जनता कफ्यूसाठी आवाहन केल्याने पहिल्या दिवशी औसेकरांचा अल्प प्रतिसाद होता. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून जनतेकडून अल्प प्रतिसाद मिळण्याचे दसून आले. नागरिकांनी जनता करफ्यूच्या काळात नियमांचे पालन करावे असे आवाहन केल्यामुळे तहसीलदार शोभा पुजारी, पोलिस निरीक्षक एन बी ठाकूर, आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरून पाहणी केली तर पोलिस आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांना तसेच दुचाकी चालकांना आर्थिक दंड आकारला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.