बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज यूनियन, औरंगाबाद॰
---------------------------------------------------------------------------------------------------------
महाबँक कर्मचार्यांचे व्यवस्थापनाविरोधात तिव्र निदर्शने.
लातूर दि. २३ – बँक ऑफ महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य राष्ट्रियकृत बँकेतील AIBEA या संघटनेचे सर्व सभासदांनी त्यांच्या विविध मागन्यांसाठी आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनचाच एक भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रातील देशभरातील शाखांतून काम करणाऱ्या सर्व सभासदांनी आज निदर्शने केली.
सदरील निदर्शने कार्यक्रम बैंक ऑफ महाराष्ट्र व्हि. सी. चौक शाखेसमोर करण्यात आला. यावेली बोलताना एआईबीओएमईएफ़ संघटनेचे सेक्रेटरी कॉ धनंजय कुलकर्णी म्हणाले कि, आज महाराष्ट्र बँकेत देशभरातील सुमारे १८७२ शाखातून काम करणारे ए.आई.बी.इ.ए.चे सहा हजारावर सभासदांनी आपापल्या शाखासमोर तीव्र निदर्शने केली ती प्रामुख्याने व्यवस्थापनाने पुरेशी नोकर भरती करावी या प्रमुख मागणीसाठी. आज बँकेत अकराशे पेक्षा जास्त शाखेतून कायम स्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत तर सहाशे पेक्षा जास्त शाखेतून कायम स्वरूपी शिपाई नेमले गेलेले नाहीत. बँकेने गेल्या पाच वर्षंपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या क्लार्कच्या जागा भरलेल्या नाहीत त्या अंदाजे एक हजारपेक्षा जास्त जागा आहेत. बँकेच्या व्यवसायाबददल बोलताना ते पुढे म्हणाले कि, बँकेने नवीन शाखा उघडल्या, तसेच बँकेच्या व्यवसायात वाढ झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा या वेगळ्याच, तर पुरेशा कर्मचाऱ्यांचे अभावी बँकेतील नित्याचे काम देखील आऊटसोर्स केले जात आहे ज्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळे होण्याच्या शक्यता निर्माण होतात. बँक अनेक वर्षापासून चालू असलेल्या प्रथेला सोडचिट्ठी देऊन, कर्मचाऱ्यांशी निगडीत निर्णय युनियनला विश्वासात न घेता एकतर्फी घेत आहे ज्यावर युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात संघटनेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी बँकेच्या देशभरातील ३७ झोनल ऑफिस समोर धरणे तर ६ मार्च रोजी केंद्रीय कार्यालय, लोकमंगल, पुणे येथे धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आणि शेवटी १२ मार्च रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगीतले.
सदरील निदर्शने कार्यक्रमास लातूर शहरातील महाबँक कर्मचारी सहभागी होऊन बँकेच्या या आढ़मुठे धोरना विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेली कॉ. उत्तम होलीकर यानी आमच्या आंदोलनास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.