औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नूतन संचालक पदी नियुक्ती
औसा मुखतार मणियार
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे दत्तात्रय व्यंकट कोळपे, पठाण वलीखॉ सरदार,उटगे संगमेश्वर बस्वराजप्पा यांची नूतन संचालक पदी मा श्री शरदचंद्रजी पवार व मा .अजित दादा पवार आणि मा बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी नूतन संचालक पदी नियुक्ती केल्याबद्दल आज दि.२५ फेब्रुवारी २०२१ गुरूवार रोजी दत्तात्रय कोळपे, पठाण वलीखॉ सरदार, उटगे संगमेश्वर बस्वराजप्पा यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदीअॅड मुस्तफा इनामदार याची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी केले या सत्कारा प्रसंगी माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, मुजाहेद शेख, पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव,भरत सूर्यवंशी, रुपेश दुधनकर,कृष्णा सावळकर, यशवंत भोसले, अॅड मुस्तफा इनामदार आदि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.