आ. अभिमन्यू पवार यांनी केली हासेगाव तांडा येथील जळालेल्या ऊसाची पाहाणी.
औसा प्रतिनिधी
औसा - हासेगाव तांडा (ता.औसा) येथील शेतकरी भिमा सोमा आडे यांचा एक एक्कर ऊसाचे शाॅर्ट सर्किटने जळून नुकसान झाल्याची घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती.दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी हासेगाव तांडा येथे भेट देवून जळालेल्या ऊसाची पाहाणी केली.व संबंधित महावितरण अभियंत्यांना या घटनेचा पंचनामा करण्याची सुचना केली.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत रोहित्री व इतर अडचणी जाणून घेत शेतरस्ते व पाणंद रस्ते याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्या कल्पना भागवत कांबळे, लिंबराज थोरमोटे, महावितरण अभियंता मुंढे, सरपंच शालूबाई राठोड, भागवत कांबळे,सुधीर पाटील, विकास नरहरे निलेश आडे, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.