वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्या ..भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ कल्पना डांगे

 वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा द्या 

..भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ कल्पना डांगे 








 औसा प्रतिनिधी 


पूजा चव्हाण या तरुणीचा 7 फेब्रुवारी 2021 रोजी मृत्यू झाला असून, पूजा चव्हाणच्या मृत्युला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक हीती   अहवालही दाखल केला नाही, पूजाच्या ऑडिओ क्लिप मधील संवादा वरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशीही केली नाही ,पोलिस हाताची घडी.... तोंडावर बोट ....ठेवून गप्प बसले आहेत ,याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे , पुजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत जे जे पुरावे बाहेर आले आहे ,त्या सर्व पुराव्यातून या प्रकरणाची वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध आहे, हेच दिसून येते ,...मात्र 

महा विकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येत आहे ,असे निवेदनामध्ये लिहिले आहे,राज्याच्या

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा,  संजय राठोड यांनी  राजीनामा दिला नाही,,,, तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, ताबडतोब तपासाचे चक्र फिरवून आरोपीस तात्काळ अटक करावी वनमंत्री संजय राठोड यांचा जो पर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन चालू ठेवू अशा मागणीचे निवेदन औसा तहसीलदार यांच्या कडे भाजपा प्रदेश सचिव सौ कल्पना डांगे यांनी दिले आहे ,यावेळी भाजपा प्रदेश सचिव सौ, कल्पना डांगे, शिल्पा दिघे, मुक्ता कदम, दीपा चव्हाण ,अंजली बनसोडे,, भाग्यश्री स्वामी, प्रिया कांबळे, सुरेखा बनसोडे हे उपस्थित होते व ह्या सर्वांचे  निवेदनावर स्वाक्षरी दिसत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या