औसा शहरात बेफाम भरधाव कार चालकाचा हैदोस...

 औसा शहरात बेफाम भरधाव कार चालकाचा हैदोस... 


मुख्य बाजारपेठ मेन रोडवर एका आॅटोसह चार दुचाकी वाहने उडवून कापड दुकानाच्या पार्किंगात कार घुसवली...






3 जण गंभीररित्या जखमी..


औसा प्रतिनिधी /-औसा शहरातील जलाल शाही ते मेन रोड मार्गे जामा मशिद जवळ लातूर येथील युवक मद्यधुंद नशेत तर्र होवून 

आपल्या ताब्यातील बेफाम स्विफ्ट डिझायर कार चालवून एका आॅटोसह चार दुचाकी वाहने चिरडल्यची घटना दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 6 : 30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

या बाबत माहिती अशी की, लातूर येथील युवक नामे राजू विष्णू उबाळे (रा प्रकाश नगर लातूर य 27 वर्षे )हा मद्यधुंद नशेत तर्र होवून

याने आपल्या ताब्यातील वाहन स्विफ्ट डिझायर कार (एमएच - 24/व्ही - 6044) बेफाम भरधाव वेगाने चालवून मुख्य बाजारपेठेतील मेन रोड वर एक आॅटोसह(एमएच - 24/ई - 5323) व दुचाकी वाहने (एमएच - 24/झेड - 5635, एमएच - 24/एएन-5033, एमएच - 24/एजे- 6248 एमएच - 24/एएम-3367) या दुचाकी वाहनांना धडक देत थेट कार डाव्या बाजूस असणाऱ्या कापड दुकानाच्या पार्किंगात घुसवली आहे याप्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत शहरातील जखमी व्यक्तीची नावे पुढील प्रमाणे :- राजा महंमदसाब बागवान (वय 38 वर्षे) रईसा राजा बागवान (वय 32 वर्षे), तानाजी भास्कर दळवे (वय 27 वर्षे) रा करजगाव जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी नातेवाईका कडून कार चालक राजू विष्णू उबाळे हा जीवने मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांवर ड्रंक आॅड ड्राईव्ह व सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. या घटनेत संबंधि औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत चालू होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या