विश्वनाथ पाटील यांचे निधन...

 विश्वनाथ पाटील यांचे निधन... 




औसा प्रतिनिधी/- विश्वनाथ  निळकंठराव पाटील (वय 75 वर्षे ) यांचे मंगळवार दि. 20 मार्च 2021 रोजी पहाटे चारच्या सुमारास निमोनियाच्या आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. दिवंगत विश्वनाथ पाटील हे मौजे बोळेगांव येथे रुग्णांना खाजगी  उपचाराच्या माध्यमातून म्हणून मनोभावे आरोग्यसेवा  देत असल्याने त्यांना डॉक्टर म्हणून ओळखत होते. प्रा. विजयकुमार पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर बोळेगांव ता. देवणी येथील त्यांच्या शेतात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या