शेतकऱ्यांचे पशुधन आणि रानावनातील मुक्या जीवासाठी भातखेडा येथील कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडावे शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

 

शेतकऱ्यांचे पशुधन आणि रानावनातील मुक्या जीवासाठी

भातखेडा येथील कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडावे 

शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी






लातूर प्रतिनिधी : ३१ मार्च :

  यावर्षीच्या अनियमीत व अत्पल्प पावसाने पाणी पातळी वाढली नाही. परीणामी सदया लातूर तालुक्यांतील पशुला प्यायला पाणी मिळत नसल्याने आता चक्क पशुची पाण्या वाचून उपासमार होत आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या पशूधनाला प्यायला पाणी मिळत नसल्याने भातखेडा येथील कोल्हापूर पाटबंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी भातखेडा, महापूर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी व पशुपालकांनी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

  माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन देऊन भातखेडा येथील कोल्हापूर पाटबंधाऱ्यात पाणी सोडण्या बाबत मागणी केली आहे.

  लातूर जिल्हयात कधी दुष्काळ कधी, कधी निसर्गाची शेतकऱ्याकडे पाठ असे दुष्टचक्र नवे नाही. अशातच गेली दोन वर्षापासून कोरोना१९ प्रादूर्भावाच्या संकटात ग्रामिण भागाचे जिवनचक्र परतू कोलमडून गेले आहे. यावर्षी पाऊस अनियमीत झाला आहे. लातूर तालुक्यांतील बोरवटी, कासारगाव, भाडगाव आदी गावात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडे पशुधन आहे. शेतकऱ्याकडील दूध देणाऱ्या गायीम्हशी  शेतीकामओढकाम करणारे बैल, गोपालनम्हैसपालन (लहान वासरेकालवडीगाभणव्यायलेल्या गाईम्हशीवळू ) यांच्या पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना पिण्यासाठी मांजरा नदीत पाणी रहायचे मात्र सदया भातखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणी नसल्याने पशुची उपासमार होत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन आणि रानावनातील मुके जीव जगवणे गरजेचे आहे. याकरीता शासनाने मांजरा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी महापूर व भातखेडा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी व पशूपालकांनी लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे केली आहे.

  या निवेदनावर सरपंच, भातखेडा शांताबाई मुळे, सरपंच, महापूर शिवाजी इराप्पा बनसोडे, सरपंच, बोरवटी गणेश नाथजोगी, चेअरमन  भातखेडा उमेश बेद्रे, उपसरपंच, भातखेडा विकास बेद्रे, व्हा.चेअरमन भातखेडा आजम शेख, व्हा. चेअरमन, महापूर संतोष भोसले, माजी सभापती भातखेडा विश्वांभर मुळे, माजी सरपंच महापूर पंडीत ढमाले तर भातखेडा येथील रामचंद्र पाटील, संजय आचवले, ॲड. सुशांत मुळे आदीच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी संजय गांधी निराधार कमिटीचे चेअरमन प्रविण पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे उपस्थित होते.

 

---------------

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या