आदिवासी नामांकित शाळेची फिस शासनाने त्वरीत द्यावी
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.31-03-2021
महाराष्ट्रामध्ये सन 2012-13 वर्षापासून इंग्रजी शाळांना आदिवासी विद्यार्थी 1 ली ते 10 वी पर्यंत निवासी दिले जातात. सन 2020-21 वर्षामध्ये इंग्रजी व इतर सर्व शैक्षणिक संस्था कोव्हिड-19 मुळे काही दिवस ऑनलाईन व काही दिवस निवासी राहुन प्रत्यक्ष क्लास चालु होते. स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन सीबीएसई स्कूलप्रमाणे काही सी.बी.एस.ई. बोर्ड काही राज्याच्या बोर्डाच्या स्कूल आहेत. चालु वर्षामध्ये ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष शिकवण्यासाठी टिचींग, नॉनटिचींग स्टाफ प्रत्यक्ष कामावरती होता. त्याला वेतन देणे सी.बी.एस.ई.बोर्डाकडे 9 वी, 10 वी विद्यार्थ्यांची फिस भरून रजिस्ट्रेशन, राहण्याची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्रातील नामांकित शाळांनी केले तरीही चालु वर्षामध्ये शासनाने एक रूपयाही फिस अद्याप दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आदिवासी राज्यमंत्री ना.प्राजक्त तणपुरे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन त्यांना चालु वर्षाच्या शाळांच्या शिक्षणाबाबतची माहिती देऊन शाळांना त्वरीत फिस देण्याची व्यवस्था करावी, अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी नामांकित इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना महाराष्ट्राचे सरचिटणीस मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिस्टमंडळाने मुंबई येथील ना.तनपुरे यांच्या बैठकीत केली आहे. यावेळी दिलीपराव पाटील, वैजनाथराव जाधव, नांदेड, सुधीर जगताप, चंदन पाटील,लातूर, शंकरराव पाटील पंचगणी व इतर जिल्ह्याचे संस्थाचालक वरीष्ट अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी शाळांना फिस देणेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन ना.तनपुरे साहेब यांनी दिल्याची माहिती कव्हेकर यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.