लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार बांधवांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व राहण्याची सोय

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार बांधवांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व राहण्याची सोय





औसा प्रतिनिधी

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाची पार्श्वभूमी पाहता वाढते कोरूना रुग्णांचे हाल पाहता व त्यांच्या नाही नातेवाईकांची होणारी हेळसांड पाहता पत्रकार व त्यांच्या मित्र परिवारांना दिलासा म्हणून त्यांच्या राहण्याची व जेवण्याची सोय लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून एका चांगल्या भावनेने हे काम करणार असल्याचे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी व सचिव सचिन मिटकरी यांनी यावेळी केले.

कोरोना रुग्णांचे ज्याप्रकारे हाल होत आहेत. तशाच प्रकारचे हाल त्यांच्या नातेवाईकांचेही होत आहेत. कारण की यांना जेवणाचा डबा मिळत नाही. त्यांना रात्री झोपण्यास जागा उपलब्ध होत नाही. अशासाठी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने मदतीचा हात पुढे केला असून जे कोणी लांबून किंवा गाव सोडून आलेले पत्रकारांचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार असतील तर त्यांच्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने राहण्याची व जेवणाची सोय लातूर तहसील कार्यालयाच्या पाठीमागील पत्रकार भवनात करण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

त्यांना धीर देण्याचा प्रयत्न पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. यावेळी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, सचिव सचिन मिटकरी, काल परिवर्तन चे संपादक संजय राजुळे, समृद्ध व्यापाराचे दत्तात्रय परडकर, दिगंबर तारे, दैनिक सुराज्य चे संजय स्वामी, संचार चे विनोद कांबळे, लहू शिंदे, रघुनाथ बनसोडे, मोहन क्षीरसागर, संतोष सोनवणे त्र्यंबक कुंभार, अरविंद रेड्डी, अमोल इंगळे, वामन पाठक, हारून सय्यद, कलियुग टाइमचे बालाजी शिंदे, एल सी एन चे हांडे, टीवी 9 चे महेंद्र जोंधळे आदि उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या