*औसा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट*
*औसा प्रतिनिधी*
औसा - तालुक्यातील किल्लारी ग्रामीण रुग्णालय व लामजना येथील कोविड केअर सेंटर ला धारशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात प्रभावी पणे राबवून घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. असे सांगितले
कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र व राज्यसरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार नागरिकांना व्हॅक्सीन लस देण्याचा वेग वाढवावा. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात यावी अशा सुचना ता.आरोग्य अधिकारी यांना दिल्या.
कोरोना काळात प्रभावी काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे असे गट विकास अधिकारी यांना सुचना दिल्या. रुग्णांची गैरसोय होणार नाही.
होम आयसोलेशन केलेले रुग्ण तसेच नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नागरिक सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास कार्यवाही करावी. असे निर्देश पोलीस प्रशासनास दिले.
तसेच कोरोना संक्रमन रुग्णांनी व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, घरात हि मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी मॅडम, गटविकास अधिकारी श्री.भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव , उपसभापती किशोर जाधव, डॉ सचिन बालकुंदे , डॉ पांढुरंग दोडके, किशोर भोसले, तलाठी विकास बुबने, विजय भोसले, बाळू महाराज आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.