*प्रतिकार करा, अंगावर येणार्याला आडवा करा,मार खाऊ नका. पँथर डॉ. राजन माकणीकर*
*मुंबई दि (प्रतिनिधी) माझ्या भावांनो मार खाऊ नका, प्रतिकार करा, अंगावर येणार्याला आडवा करा. पुढील न्यायालयीन कारवाईस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कनिष्क कांबळे यांच्या माध्यमातून तुमच्या संरक्षणार्थ उभी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली.*
पँथर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले, बौद्ध जमात ही फार शूर व लढवय्ये आहे, सिदणाक महार या पराक्रमी योध्याचे वारस आहात तुम्ही, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी विचारांचे वारस आहात तुम्ही. स्वतःला दुबळे समजू नका, दलिंदर दलित नाहीत तुम्ही, अंगातला दुबळेपणा झाडून टाका. मनुवादी प्रवृत्तींना ठेचून काढा. प्रसंगी आडवा करा न्यायालयीन संरक्षणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तुमच्या पाठिंशी उभी असेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
भोसा मानवत परभणी तील अंकुश झोडपे जातीय द्वेषातून जीवघेणा हल्ला झाला त्यातून ते बालबाल बचावले याप्रकरणी रिपाई चे राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महाआघाडी सरकारच्या काळात बौद्ध दलित व मुस्लिम स्वतःला असुरक्षित समजत आहेत, ज्या मनुवाद्यांनी हल्ला केला त्यांचे कडक शासन होणे गरजेचे आहे.
राज्यात परभणी मनुवादयांचे केंद्र बनले असून बऱ्याच अन्याय अत्याचाराच्या घटना याच जिल्ह्यात घडत आहेत. 25 बौद्धांनी तर गाव सोडून परभणीत वास्तव्य केले आहे, ही दहशत म्हणजे आंबेडकरी समुदयावर अंकुश ठेवणे होय, आमदार खासदार सेने चे आहेत.
प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा मिरवणारे मुख्यमंत्री मनुवादी दुटप्पी धोरण अमलात आणत असतील तर आंबेडकरी अनुयायी असे हल्ले कदापि सहन करणार नाही. मनुवादी लोकांवर अट्रोसिटी कायद्यांतरंगत संरक्षण देऊन गावगुंडांना तडीपार करण्यात यावे अन्यथा पक्षप्रमुख कनिष्क कांबले यांचे नेतृत्वात तीव्र आंदोलन केक जाईल. उंटणार्या पडसादला शासन व प्रशासन जवाबदार राहील असा इशाराही पँथर डॉ राजन माकणीकर यांनी यावेळी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.