औसा पालिकेने घरपट्टी नळपट्टीत 50 टक्के सवलत द्यावी:आम आदमी पार्टीची मागणी

 औसा पालिकेने घरपट्टी नळपट्टीत  50 टक्के सवलत द्यावी:आम आदमी पार्टीची मागणी





 औसा मुख्तार मणियार

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून सर्व व्यवसाय बंद असल्याने मजूर व कारागिरांच्या हाताला काम नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच औसा नगर परिषदेने मालमत्ताधारकांना दंड व्याजासह घरपट्टी /नळपट्टीच्या नोटिसा बजावल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत .लाॅकडाऊन मुळे नागरिकांना कौटुंबिक खर्च भागविणे मुश्कील झाले असून नगरपरिषदेने मालमत्ता करात 50 टक्के सवलत द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर व मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे . अजिंक्य शिंदे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत दिलेल्या निवेदनावर शहराध्यक्ष अहेमद शेख ,उपाध्यक्ष मेहराज अली कुरेशी ,बाबर शेख ,प्रसिद्धीप्रमुख मुक्तार मणियार यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या