कामावर जिवापाड प्रेम करणारे ‘गुणवंत कामगार’ महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ दस्तगीर रहीमान शेख सेवानिवृत्त
लातूर : महावितरण कंपनीत 40 वर्ष 10 महीने अखंडित सेवा देणारे दस्तगीर रहीमान शेख हे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन सोमवार 31 मे रोजी निवृत्त झाले. महाराष्ट्र राज्य विज मंडळात किल्लारी येथून रोजंदारीवर कामाची सुरु करणारे दस्तगीर शेख हे वरिष्ठ तंत्रज्ञ पदा पर्यंत पोहचले. वयो मर्यादेनुसार दस्तगीर शेख हे निवृत्त झाले आहेत. कमावरील निष्ठा, प्रामाणीकपणा व विज ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्यात तत्पर असलेले दस्तगीर शेख हे नागरिकांसोबतच विज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळयातील ताईत झाले बनले होते. त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणुन महावितरण कंपनी तर्फे गुणवंत कामगार म्हणून दस्तगीर शेख यांना गैरविण्यात आले होते.
लातूर शहरात काम करीत असताना अधिकाऱ्यांनी, सहकार्यांनी व नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य व प्रेम दिल्यामुळेच पूर्ण निष्टेने काम करु शकलो, विज ग्राहकांस अखंडित विज पुरवठा चालू राहिल व त्यांच्या समस्याचे तत्परतेने निरसन करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. अशी प्रतिक्रीया दस्तगीर शेख यांनी व्यक्त केली आहे. विज वितरण कंपनीची आर्थिक पाया विज बिल वसूली आहे आणि ती करीत असताना विज ग्राहकांचे चुकुन मन दुखावले गेले असेल तर माफ करावे व आपले प्रेम कायम ठेवावे असे भावनीक आवाहन दस्तगीर शेख सेवानिवृत्त होत असताना केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.