अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त औशात रक्तदान करुन अभिवादन
औसा प्रतिनिधी
अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त औसा येथील कार्यकर्त्यांनी ध्वजारोहण करीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन" येळकोट येळकोट जय मल्हार" चा जयघोष करीत अभिवादन केले .सोमवार दिनांक 31 मे रोजी सकाळी 10 वाजता येथील अहिल्यादेवी होळकर चौकात नगरसेवक अॅड. मंजुषा हजारे व गोपाळ धानुरे,गजेंद्र डोलारे सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे ,जयराज कांबळे सूर्यभान कांबळे,तानाजी कांबळे, अमोल कांबळे, कृष्णा डपाळ, शिवाजी कांबळे,अमोल कांबळे, वैजनाथ कांबळे, गणेश गाडेकर, कृष्णा कांबळे, व्यंकट कांबळे ,खंडू कांबळे, विजय कुमार आष्टुरे, महादेव कांबळे आदी सर्व समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह येथे सर्वश्री दादा कोपरे ,किशन कोलते ,सुधाकर माळी ,पप्पू खुरपे, लातूर ब्लड बँकेचे डॉक्टर कुलकर्णी ,मेघराज राऊत, दिपाली बरडे,सारिका राऊत ,यांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.