'इंधन समस्या आणि नवे पर्याय' संस्थागत प्रशिक्षण कार्यक्रम !
लातूर: शनिवार दि.२९ मे रोजी पीसीआरए आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय नागपूर यांच्या वतीने संस्थागत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.'इंधन समस्या आणि नवे पर्याय' या विषयांवरती पॉवरपॉइंट द्वारे ऊर्जा लेखा परीक्षक खमितकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. औ.प्र.संस्था नागपूर हुन प्राचार्य हेमंत आवारे, औसा येथील प्राचार्य जी.आर.कलमे, नागपूर व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयच्या - निरीक्षक सीमा महाजन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय सक्षम महोत्सव 2021 गीताद्वारे करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य हेमंत आवारे यांनी केले. संपूर्ण विश्वाचा व्यवहार हा एका ऊर्जेवर चालू असतो, किंबहुना ही सगळी सृष्टी गतीमान ठेवण्यासाठी सूर्य नावाच्या ऊर्जेचे फार मोठे वरदान निसर्गाने दिले आहे. परंतु जगाला या ऊर्जेचे महत्त्व आता आता लक्षात येऊ लागलेले दिसते आहे. भारतासारख्या देशात 365 दिवसांपैकी 300 दिवस लख्ख सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर भारत हा कदाचित जगातील सर्वाधिक सौर ऊर्जा निर्माण करणारा देश ठरू शकेल असे खमितकर म्हणाले. औद्योगिक वेबिनार मध्ये नागपूर विभागातील औ.प्र. संस्थेचे एकूण ९० इन्स्ट्रक्टर विदर्भ , मराठवाडा आदी वेगवेगळ्या ठिकाणाहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निरीक्षक सीमा महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आणि कोऑर्डिनेशन अभियंता किरण खमितकर यांनी वरदानी भवन लातूर येथून यशस्वीपणे केले. गृह ऊर्जा व्यवस्थापन अंतर्गत एलपीजी स्वयंपाकाचा गॅस, विद्युत, पेट्रोल आणि डीजल या पारंपरिक ऊर्जेच्या वापरात प्रत्येक घराघरात कमीत कमी २० % पर्यंत बचत करण्याच्या सोप्या पद्धती या जनजागृती कार्यक्रमात देण्यात आले. "ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी' असा संदेश या अभियानाद्वारे देण्यात येत आहे. कार्यक्रमाचा समारोप सक्षम प्रतिज्ञेने करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.