केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिराश आश्वासनांची पूर्तता तर नाहीच उलट देश अनेक वर्ष मागे गेला

 

केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिराश

आश्वासनांची पूर्तता तर नाहीच उलट देश अनेक वर्ष मागे गेला

 

कोरोना लस उत्सव साजरा करून

म्हणणारेच लस पुरवठा करण्यात कमी पडले

- ना.अमित विलासराव देशमुख

·         औषधाचे रेशनिंग हे दुदैवच

·        जनता संकटात देशाचे प्रमुख प्रचारात

·        जागतिक पातळीवर नाचक्की

·        देशाची अर्थव्यवस्था रसातळाला









लातूर प्रतिनिधी (रवीवार दि. ३० मे २१)

  सबका साथ सबका विकास, कार्यक्षम आणि भृष्टाचारमुक्त प्रशासन यासह मोठमोठी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील जनतेचा पूरता भ्रमनिराश केला आहे. केद्रसरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात आपण काय कमावले आणि काय गमावले असा विचार केला तर देश अनेक वर्ष मागे गेला असल्याचे आपणाला जाणवल्या शिवाय राहत नाही. महागाईने उंच्चाक गाठला असतानाच कोरोना सारख्या महामारीतही मोदी सरकारने हात वर केल्याने आज देशातील जनतेची केवीलवाणी स्थिती निर्माण झाली असल्याची टिका काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथे पत्रकार परीषदेत केली.

  केंद्रातील भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने या कार्यकाळातील सरकारचे अपयश जनते समोर मांडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी रवीवार दि. ३० मे २०२१ रोजी दुपारी काँग्रेस भवन, लातूर येथे पत्रकार परीषद घेऊन केंद्रसरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. या पत्रकार परीषदेला लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धीरज विलासराव देशमुख, मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, अभय साळुंके, जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे यांची उपस्थिती होती.          

   देशाची अर्थव्यवस्था रसातळाला

  या प्रसंगी पूढे बोलतांना ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महागाई कमी करू शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव देऊ बेरोजगारांना रोजगार देऊ, देशाला महाशक्ती बनवू अशी किती तरी आश्वासने देऊन केंद्रात भाजपचे सरकार सतारूढ झाले होते. दुदैवाने मागच्या सात वर्षात यापैकी एकाही आश्वासनांची पूर्तता झाली नाही. उलट नोटबंदी करून चुकीच्या पध्दतीने जीएसटी लावून देशातील उदयोग व व्यापार देशोधडीला लावला आहे. युवकांना रोजगार देण्या ऐवजी आहे आहेत त्या नोकऱ्या काढून घेऊन कोटयावधी लोक बेरोजगार केले आहेत. यातून देशाची अर्थव्यवस्था रसातळाला पोहचवली आहे.   

जागतिक पातळीवर नाचक्की

   देशाला महाशक्ती बनवण्याचे स्वप्न दाखवणारे या मंडळीनी आतंरराष्ट्रीय पातळीवरचे संबंध बिघडवून आपल्याच देशाला एकाकी पाडले आहे. शेजारी देशाशीही संबंध बिघडवले आहेत. चिन सारख्या शेजारी राष्ट्राने आपल्यावर कुरघोडी करून आपले सैनिकही मारले आणि जमीनही बळकावली आहे. केंद्राच्या या अपयशावर बोलणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवण्याची पध्दत नव्याने रूढ झाली आहे. यातून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे.

जनता संकटात देशाचे प्रमुख्‍ प्रचारात

  आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव घसरले असतांना देशातील जनतेला शंभर रूपय लिटरच्या भावाने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे. यातून वाढलेल्या  महागाईचा भार झेलत असलेल्या जनतेला कोरोना महामारीच्या संकटलाही एकाकी सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचे हे संकट जागतिक पातळीवर प्रत्येक देशाने त्यास राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून जनतेसाठी आरोग्याच्या सोयीसुवीधा पूरवल्या आहेत. आपल्या देशात मात्र जनतेला संकटात सोडून देशाचे प्रमुख प्रचार सभा घेत असल्याचे जगाने पाहिले आहे.

  औषधाचे रेशनिंग हे दुदैवच

  कोरोनाच्या या महामारीला गार्भीयाने न घेतल्यामुळे देशाची जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे. कधीकाळी संपूर्ण जगाला वेगवेगळया लसी, औषधे आणि ऑक्सिजन पूरवणाऱ्या आपल्या देशात या त्याचाच तुटवडा निर्माण होवून त्यांचे रेशनिग करावे लागने हे दुदैवच म्हणावे लागेल. रेमडीसीव्हीर, ॲम्फोटेरीसीन-बी ही औषधे व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या अपयशाची जबाबदारी स्विकारण्या ऐवजी केंद्रातील सरकार राजकारण आणि भेदभाव करतांना दिसत आहे.

नियोजना शिवाय लसउत्सवाची घोषणा

  जगभरातील देश लसीकरणाची मोहिम राबवत असतांना आपल्या देशाचे प्रमुख प्रचार सभा गाजवत होते. आपल्या देशात तयार झालेली लस इतर देशांना वाटत होते. लसीकरणाचे कोणतेही धोरण न आखता आणि नियोजन न करता त्याचा लस उत्सव साजरा करण्या बाबत भाष्य करीत होते. दुदैवाने याच काळात कोरोनाची दुसरी लाट देशात पसरली आणि त्यातून अनेकांनी प्राण गमावले, गंगा नदीत अनेक मृतदेह तंरगत असल्याचे जगातील माध्यमांनी दाखवले. या गोष्टीची जबाबदारी मात्र केंद्रसरकार स्विकारतांना दिसत नाही. आजही राज्यांना पूरेश्या प्रमाणात पूरवठा होत नाही, राज्यसरकारांनी लस खरेदी करावयाची ठरवली तरी ती मिळत नाही. केंद्र सरकारच्या या अनागोदी कारभाराची माहिती जनतेपर्यत पोचवण्याचे कार्य अखिल भारतीय काँग्रेस पक्ष करणार असल्याचे ना. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

  डिंसेबर २०२१ अखेर देशातील लसीकरण पूर्ण केले जाईल असे केंद्रातील मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे. या बाबत विचारले असता आम्ही त्या गोष्टीचे स्वागत करू मात्र त्यांनी त्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते असे ना. देशमुख म्हटले आहे. केंद्राने लसीकरणाकडे दूर्लक्ष केले त्यांची ही चूक देशाला न परवडणारी ठरली आहे. त्या चूकीची येथील जनतेला मोठी किंमत चुकवावी लागली आहे हे कधीही विसरता येणार नाही हे त्यांनी नमूद केले.

-----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या