देशातील निष्क्रिय मोदी सरकारचा
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कडून निषेध,
लातुरातील काँग्रेस भवन समोर निषेध आंदोलन.
लातूर प्रतिनिधी (रवीवार दि. ३० मे २१)
केंद्रातील भाजप पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन सात वर्ष पूर्ण झाले असून सर्व आघाडयावर हे सरकार अपयशी ठरले आहे. महागाईने उच्चांक गाठला असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना जगणे अवघड झाले आहे. कोरोना महामारीचे संकट गाभीर्याने न घेतल्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच लसीचे पुरेषे उत्पादन नसताना उतावळेपणाने देशात लसीकरण उत्सवाची घोषणा करून देशातील नागरिकांची गैरसोय केली. यावर देशातील निष्क्रिय मोदी सरकारच्या विरोधात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवार दि. ३० मे रोजी सकाळी लातूरच्या काँग्रेस भवन समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अध्यक्ष ॲड.किरण जाधव, पृथ्वीराज शिरसाठ, कैलास कांबळे, पुनीत पाटील, जब्बार पठाण, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, मोहन सुरवसे, सुभाष घोडके, बाबासाहेब गायकवाड, सचिन दाताळ, महेश काळे, ॲड. देविदास बोरूळे पाटील, सिकंदर पटेल, हरिराम कुलकर्णी, प्रमोद जाधव, व्यंकटेश पुरी, प्रवीण कांबळे, अभिशेक पतंगे, प्रा. सुधीर आनवले, प्रवीण घोटाळे, अकबर माडजे, मोहसीन शेख, अय्युब मणियार, युनूस मोमीन, अभिजित इगे, नामदेव इगे, ओम प्रकाश झुरळे, करीम तांबोळी, सागर मुसांडे, दिनेश गोजमगुंडे, सोमेन वाघमारे, प्रमोद जोशी, कुणाल वांगज, जय ढगे, जाफर पटवेकर, राजू गवळी, दत्ता सोमवंशी, बालाजी झिपरे, नारायण चाटे, युनूस शेख, पप्पू घोलप, सचिन गंगावणे, प्रवीण पाटील, आनंद वैरागे, श्याम भोसले, मातीन सय्यद, भूषण पनुरे, प्रदीप काळे, सिद्धार्थ चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, दत्तोपंत सूर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, अमित जाधव, अजय वागदरे, बिभीषण सांगवीकर, यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.